काल स्वप्नात देव आला ,
म्हणाला काहीतरी माग,
सगळ्या तुझ्या मागण्यांची एक लिस्ट च बनवून टाक ,
दोन किंवा तीन तरी पूर्णच करीन पोरी,
अस काहीतरी माग,
ज्यानं सुखी होशील खरी
आवकच मी झाले म्हणलं हे कस काय घडलं ?,
तपश्चर्येशिवायच फळ मला मिळाल..
आलेल्या संधीच मी सोनंच करून घेतलं ,
मनी असलेल्या इच्छांना देवापुढे मांडलं
पहिली ऐकून मागणी माझी ,
देव हसला जोरात,
म्हणे काही उपाय कर,
असेल आरोग्य तुझ्या पदरात.....
जिभेवरती ताबा त्याला व्यायामाची जोड ,
फास्टफूड वैगेरे ची संगतच तू सोड ...
दुसऱ्यांदा मागितल मी लक्ष्मी च दान
म्हणलं राहूंदेत आता मला ऐषोआरामात ,
पुन्हा एकदा तो हसूनच वदला ,
"बाळा , खूप साऱ्या पैशांचा ,
हव्यासाच नाही बरा"...
मनात म्हणलं आता तर ,
एकाच मागणी राहिली ..
दोन किंवा तीनचीच तर
ठरली होती बोली ....
समाधानी जगण्याचं तर ,
दान दे देवा ...
म्हणाला त्यासाठी तर मनाचाच
अभ्यास हवा...
प्रसन्न कर मन ,
नको स्पर्धा कुणाशी ...
समाधान मग असेल तुझ्याच पाशी ...
असं म्हणून देव
कुठे दिसेनासा झाला ...
आपला सुख आपल्याच हातात
असा मूलमंत्रच त्याने दिला ...
दूरवरून एक आवाजच कानी आला ...
मंत्र लक्षात ठेव अन पुढे चाल बाळा ...
साथ तर माझी आहेच
निरंतर तुला
म्हणाला काहीतरी माग,
सगळ्या तुझ्या मागण्यांची एक लिस्ट च बनवून टाक ,
दोन किंवा तीन तरी पूर्णच करीन पोरी,
अस काहीतरी माग,
ज्यानं सुखी होशील खरी
आवकच मी झाले म्हणलं हे कस काय घडलं ?,
तपश्चर्येशिवायच फळ मला मिळाल..
आलेल्या संधीच मी सोनंच करून घेतलं ,
मनी असलेल्या इच्छांना देवापुढे मांडलं
पहिली ऐकून मागणी माझी ,
देव हसला जोरात,
म्हणे काही उपाय कर,
असेल आरोग्य तुझ्या पदरात.....
जिभेवरती ताबा त्याला व्यायामाची जोड ,
फास्टफूड वैगेरे ची संगतच तू सोड ...
दुसऱ्यांदा मागितल मी लक्ष्मी च दान
म्हणलं राहूंदेत आता मला ऐषोआरामात ,
पुन्हा एकदा तो हसूनच वदला ,
"बाळा , खूप साऱ्या पैशांचा ,
हव्यासाच नाही बरा"...
मनात म्हणलं आता तर ,
एकाच मागणी राहिली ..
दोन किंवा तीनचीच तर
ठरली होती बोली ....
समाधानी जगण्याचं तर ,
दान दे देवा ...
म्हणाला त्यासाठी तर मनाचाच
अभ्यास हवा...
प्रसन्न कर मन ,
नको स्पर्धा कुणाशी ...
समाधान मग असेल तुझ्याच पाशी ...
असं म्हणून देव
कुठे दिसेनासा झाला ...
आपला सुख आपल्याच हातात
असा मूलमंत्रच त्याने दिला ...
दूरवरून एक आवाजच कानी आला ...
मंत्र लक्षात ठेव अन पुढे चाल बाळा ...
साथ तर माझी आहेच
निरंतर तुला