Sunday, 13 November 2016

Jagana!!


जगणं
सततच धावणं धावत धावता ठेचकाळण
ठेचकाळून पडणं ,पडून लागणं
त्यातूनही सावरणं ,.....
अन पुन्हा धावायला लागण
हेच तर असत जगणं ....
हेच तर असत जगणं .....

आनंदाला कधी आलेल उधाण
दुःखाच्या समुद्रात कधी बुडून जाणं 
हसता हसता रडणं
अन रडता रडता  हसणं
हेच तर असत जगणं ....
हेच तर असत जगणं .....

घरच्यांवर कधी उगाचच चिडणं ,
मुलांवरती अकारण ओरडणं
आणि सगळं शांत झाल  की मग
कोपऱ्यात बसून हळहळण ..
हेच तर असत जगणं ....
हेच तर असत जगणं .....

दोन-चार रुपयांसाठी कुठेही हुज्जत घालणं
अन हजारांची नोट क्षणात सिनेमासाठी उधळण
काटकसरीने कधी काडी काडी जमवणं
अन मनात येईल तेव्हा हव तस उधळण
हेच तर असत जगणं ....
हेच तर असत जगणं .....

निसर्गाच्या सानिध्यात कधी खुशाल रमण ,
गवताच्या पात्यावरच दव  उत्सुकतेनं न्याहाळणं
पावसाच्या पहिल्या थेंबाने शहारून जाणं ,
मग निसर्गाच्या अलौकिक शक्ती पुढे नतमस्तक होणं
हेच तर असत जगणं ....
हेच तर असत जगणं .....

कधी उदास,निराश,हाताश  होणं
सगळं निरर्थक वाटणं
पार थकूनथकून जाणं
पण पुन्हा उठणं .......


अन मग पुन्हा धावणं ,ठेचकाळण ,पडणं .....
लागणं ,त्यातून सावरणं आणि .....
पुन्हा धावायला लागणं
हेच तर जगणं ..
हेच तर जगणं???

No comments:

Post a Comment