Sunday, 13 November 2016

Jaganyachi Moheem



जगण्याची मोहीम

आनंदान जगण्याची एक मोहीमच आखावी
अन मनाला आलेली मरगळ क्षणात दूर व्हावी

आठवणींच्या गावात एक चक्कर मारावी
अन भूतकाळातील गम्मत शाहजचं अनुभवावी

गाण्याची एखादी मैफल निवांत ऐकावी
अन उत्स्फूर्त पणे दाद देऊनच टाकावी

दूरदेशी भ्रमंती करावी
अन तिथल्या खाद्य पदार्थांची गोडीही चाखावी

जिथे असतो तिथे एखादी मैत्रीण मात्र जोडावी
सकाळ-संध्याकाळ फिरताना तिची कैफियत ही ऐकावी

एखाद्या दिवशी आळसाशी गट्टीच करावी
असलेली सारी काम बाजूला ठेवून मस्त झोप काढावी

मुलांची एखादी हौस सहजच पुरवावी
अन पात्यांच्या डावात त्यांची साथ सांगत करावी

हातगाडीवरची पाणीपुरी मजेत चाखावी
घरातही भाजी भाकरी ताव मारून खावी

दुसऱ्यांच्या गुणांवर स्तुतीसुमन उधळावी
अन स्वतःच्या चुका कबूल करायची सवयच लावून घ्यावी

जीवन आहे हे तर दुःख तर यावीच
पण धैर्याने त्यावरही मत करावी



अन आनंदने जगण्याची एक मोहीमच आखावी !!!

No comments:

Post a Comment